स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा
इतिहासात दडलेल्या स्वराज्याच्या गोष्टी
त्रिवार मुजरा महाराष्ट्र, सह्याद्री, स्वराज्य, सर्व छत्रपती राजे आणि सर्व परिचित-अपरिचित वीरांना ज्यांच्यामुळे अशक्यातून स्वराज्य शक्य झालं
आजच्या काळात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि एकूणच स्वराज्याबद्दल काही ठळक घटना व घडामोडी फक्त प्रसिद्ध आहेत. पण अशा कित्येक जास्त परिचित नसलेल्या, माहिती नसलेल्या आणि इतिहासात दडून बसलेल्या घटना व माणसं आहेत ज्यांना प्रसिद्धी मिळणं गरजेचं आहे. ते झालं तरच स्वराज्य स्थापनेच्या ह्या महत्कार्याचा खरा आवाका आणि परिणाम पुढे येईल. या वेबसाईट द्वारे अशी माहिती लोकांपर्यंत पोचवून स्वराज्यची छोटीशी सेवा करण्याचा मनोदय आहे
स्वराज्य लेखसंग्रह
उपलब्ध ऐतिहासिक साधनातून अशा अनेक अपरिचित कथा उजेडात येतात - ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अनेक महत्वपूर्ण घटनाक्रम आणि त्या घटनांमागची व्यक्तिमत्व - स्वराज्याच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. अशा घटना आणि माणसे ह्याबद्दलचे लेख संग्रह वाचून, जाणून घ्या मराठा स्वराज्याची अपरिचित पण सत्य हकीकत. ह्या लेख संग्रहातले संदर्भ समकालीन मराठी, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज वगैरे अनेक साधनातून तसेच प्रख्यात उत्तरकालीन साधनातून घेतले आहेत
समकालीन पत्रे
इतिहास संशोधनासाठी एक सर्वात महत्वाचे साधन म्हणजे समकालीन पत्रसंग्रह. पत्रातून त्या वेळची परिस्थिती आणि घटनाक्रम समजायला मदत होते. तसेच राजनैतिक धोरणे आणि महत्वाचे निर्णय वगैरे उजेडात येते. पत्रातून काही वेळा अशा गोष्टी समजतात ज्यांचा संदर्भ अथवा नोंद दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. बहुतांश पत्रांना तारीख असल्यामुळे घटनांचा कालखंड ठरवण्यात सुद्धा पत्रांची बहुमूल्य मदत होते. मराठी , इंग्रज , मोगल आणि इतर समकालीन पत्रसंग्रहातून निवडक अशी वेधक पत्रे इथे वाचा
ऐतिहासिक साधनातल्या नोंदी
जुन्या समकालीन आणि उत्तरकालीन साधनात बरेच ठिकाणी काही लक्षवेधक आणि महत्वपूर्ण नोंदी सापडतात. बरेच वेळा मोठा प्रसंग किंवा घटना आपल्याला ज्ञात असते
पण त्यातले सूक्ष्म धागे आणि तपशील माहिती नसतो. अशा काही रोमांचक आणि महत्वपूर्ण नोंदी इथे प्रस्तुत केल्या आहेत. ह्यातले जवळपास सगळे संदर्भ हे समकालीन अथवा उत्तरकालीन साधनातून घेतले आहेत
नवीन लेख
